करूणा धनंजय मुंडे पुस्तक रुपाने उलगडणार आपली रहस्यमय प्रेम कथा

 

करूणा धनंजय मुंडे पुस्तक रुपाने उलगडणार आपली रहस्यमय प्रेम कथाबीड : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या नात्यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता त्यावेळी स्वतः धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर संबंधात होतो असा खुलासा केला होता.  एवढेच नाही तर या महिलेपासून आपल्याला दोन मुलं असल्याचाही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट मधून खुलासा केला होता.  

करुणा धनंजय मुंडे, असं त्या महिलेचं नाव असल्याची माहिती समोर आली. करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. 

करुणा धनंजय मुंडे या नावाने फेसबुक अकाउंट असलेल्या पेज वरून त्यांच्यातील प्रेम कथेचे रहस्य उलगडणार असल्याचे सांगितले गेले आहे. सोबतच एक फोटोही जोडण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post