शरद पवारांची बार मालकांबाबत कळकळ पाहून कंठ दाटून आला

 

शरद पवारांची बार मालकांबाबत  कळकळ पाहून  कंठ दाटून आला

भाजपच्या अतुल भातखळकर यांचा टोलामुंबई: फेब्रुवारीपासून राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असून, राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही याची झळ बसली असून, यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं ट्विट केलं असून, टोला लगावला आहे. “शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो,” असा टोला भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post