भाजपच्या आलिशान कार्यालयात कोविड रूग्णांची व्यवस्था करावी, पक्षाच्या खासदाराची मागणी

 

भाजपच्या आलिशान कार्यालयात कोविड रूग्णांची व्यवस्था करावी, पक्षाच्या खासदाराची मागणीनवी दिल्ली: बेधडक वक्तव्यांमुळे व ट्विटमुळे सदैव चर्चेत राहणारे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज भाजपाला एक सल्ला दिला आहे.

”करोना महामारीमुळे सर्वत्र निर्माण होत असलेली परिस्थिती पाहता, मी सुचवतो की दिल्लीतील आठ मजली पक्ष कार्यालयाच्या इमारतीमधील वरील सहा मजले रूग्णालयात रूपांतरित केले जावेत. भाजपाकडे अद्यापही अशोका रोडवरील शासकीय बंगल्यातील जुने कार्यालयं आहेत, ज्यांचा पक्षाच्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो.” असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post