राष्ट्रवादीच्या आ.लंके यांचे कोविड सेंटर राज्यात आदर्शवत, 'भाजप'कडून कौतुक

राष्ट्रवादीच्या आ.लंके यांच्या कोविड सेंटरचे भाजपकडूनही तोंड भरून कौतुकनगर : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके  यांनी कोव्हिड सेंटर उभारुन कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. भाजप आमदार श्वेता महाले  यांनी नुकतीच या कोव्हिड सेंटरला भेट दिली. यावेळी महाले यांनी लंकेंचं काम राज्यात आदर्शवत असल्याचं सांगत कौतुक केलं. 

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कोव्हिड सेंटर उभारले आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी त्याला भेट दिली. “आमदार निलेश लंके हे विधानसभेतील आमचा चांगले सहकारी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही ते गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आदर्श काम करत आहेत” अशा शब्दात श्वेता महाले यांनी निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक केलं. विरोधीपक्ष भाजपच्या आमदार असताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक महालेंनी केल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post