काँग्रेसने भिंगारमध्ये मास्क, सॅनिटायझरचे मोफत वाटप करीत केली नागरिकांमध्ये जनजागृती*काँग्रेसने भिंगारमध्ये मास्क, सॅनिटायझरचे मोफत वाटप करीत केली नागरिकांमध्ये जनजागृती 

 काँग्रेसच्या लखन छजलानी यांचा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रेरणेतून पुढाकारनगर : कोरोनाच्या रुग्ण संख्येने नगर शहरासह जिल्ह्यामध्ये चार हजाराचा आकडा पार केला आहे. ही रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. त्याच बरोबर लोकांमध्ये सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करणे तसेच विनाकारण बाहेर न पडणे याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. याच गोष्टी लक्षात घेत काँग्रेसने भिंगारमध्ये मास्क, सॅनिटायझरचे मोफत वाटप करीत नागरिकांमध्ये घरोघरी जात जनजागृती केली आहे.*


काँग्रेसचे लखन छजलानी यांच्या पुढाकारातून भिंगारमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी छजलानी यांच्यासह सूरज वाणे, विकी करोलीया, सनी चव्हाण, जितू छजलानी, तरुण चव्हाण, तेजस भगवाने, राम छजलानी, गणेश पाठक, योगेश सोळंकी, गोलू संगत, विनोद वैराट, युवराज संगत आदी या कार्यात सहभागी झाले होते.


याबाबत अधिक माहिती देताना लखन छजलानी म्हणाले की, भिंगारमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. लोकांना ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटरचे बेड मिळण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. आम्ही काँग्रेस पक्षाच्या कोविड सहाय्यता व मदत केंद्राच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून भिंगार मधील नागरिकांना दिलासा देण्याचे काम अहोरात्र करीत आहोत. 


शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे स्वतः मैदानात उतरत सर्वसामान्य नगरकर आणि आमच्या भिंगारकरांसाठी रात्री-अपरात्री मदतीला धावून येत आहेत. कोरोना महामारीच्या संकट काळात सर्वसामान्य माणसं, गोर-गरीब लोक यांची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किरणभाऊ करत असलेली ही मानव सेवा लोकं कधीही विसरणार नाही, असे छजलानी यावेळी म्हणाले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post