नेवासा तालुक्यात जुन्या वादातून गोळीबार, एक युवक जखमी

 

नेवासा तालुक्यात जुन्या वादातून गोळीबार, एक युवक जखमी



नेवासा - काल रविवारी रात्री भेंडा येथे पूर्वीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21 वर्षे) रा.भेंडा, ता.नेवासा हा युवक जखमी झाला असून त्याचा वर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, भेंडा येथील सोमनाथ तांबे व त्याचे इतर 5/6 मित्र रविवार दि.2 मे रोजी रात्री भेंडा येथील एका मैदानावर क्रिकेट खेळत असताना रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने खेळत आलेल्या या तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात  गोळी लागल्याने सोमनाथ लागल्याने तो गंभीर जखमी झाला .गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.नेवासा पोलिस ठाण्यात भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post