मार्केट यार्ड बाजार समिती १५ मे पर्यंत बंद, भाजीपाला, फळविक्री नेप्ती उपबाजारात


मार्केट यार्ड बाजार समिती १५ मे पर्यंत बंद, भाजीपाला, फळविक्री नेप्ती उपबाजारात नगर: करोना प्रतिबंधक उपाययोजना आणखी कडक करत प्रशासनाने अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटयार्ड, सारसनगर, अहमदनगर येथील सर्व व्यवसायिक दुकाने, भाजीपाला व फळे विक्रेते यांचे दुकाने दिनांक 01/05/2021 रोजी सकाळी 07.00 वाजेपासुन ते दिनांक 15/05/2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच सदरचे व्यवसायिक दुकाने व भाजीपाला व फळे विक्रेत्यांची दुकाने हे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर उपबाजार आवार नेप्ती, अहमदनगर येथे सुरु करण्याबाबतपुढील कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी जारी केले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post