वादळी पावसाचा तडाखा...शेतीसह राहत्या घरांचे मोठं नुकसान

 

पाथर्डी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा...शेतीसह राहत्या घरांचे मोठं नुकसानपाथर्डी : रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पावसासह चक्री वादळात घरातील पत्रे अंगावर पडून तालुक्यातील माळी बाभूळगाव मधील भोईटे वस्ती येथील आश्रू रामभाऊ भोईटे (वय ७५ ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने परिसरातील तरुणांनी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.त्यांनतर पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात  दाखल केले आहे. 


रविवार दि 2 में दुपारी अचानक  तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने मोठ्या प्रमाणत नुकसान होऊन अनेक घरांची पडझड झाली आहे. माळी बाभूळगाव येथील भोईटे वस्तीवर राहणारे आश्रू रामभाऊ भोईटे, कांता आश्रू भोईटे,सतीश कांता भोईटे यांच्या राहत्या घराचे पत्रे जोराच्या वादळी हवेने उडून गेले असून घराची वरंडी पडली आहे.यामध्ये घरात असलेले  आश्रू रामभाऊ भोईटे हे गंभीर जखमी झाले आहे.अन्न धान्यासह संसार उपयोगी सर्व वस्तूची पाऊसामुळे नासधूस झाली आहे.संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. आंबा,डाळिंब,टरबूज,खरबूज,पपई आदी फळबागांसह कांदा,भुईमूग व  इतर चार पिकांचे मोठयास्वरुपात नुकसानी झाल्या आहेत. पाणी शेतात साठल्याने उभ्या पिकांचे नुकसान होणार आहे.

माळी बाभुळगाव आणि परिसरात शेतीसह राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहेत.झाडे वादळीवाऱ्याने निखळून पडली आहे.कोरोनाचे संकटात शेतकरी उद्धवस्त झाला असतांना  त्यानंतर अवकाळी पावसासह वादळीवाऱ्याने शेतकऱ्यांचे शेती पिकांची नुकसानी झाल्या आहेत.शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी भाजपाचे युवक तालुकाध्यक्ष सचिन वायकर यांनी केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post