पंढरपुरात राष्ट्रवादीला दे धक्का...भाजपचे समाधान आवताडे विजयी

 पंढरपुरात राष्ट्रवादीला दे धक्का...भाजपचे समाधान आवताडे विजयीपंढरपूर- राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजनीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे. 

समाधान आवताडे

  • ईव्हीएम- 1,07,774 मते
  • पोस्टल - 1676 मते
  • एकूण-  1,09,450 मते

भगीरथ भालके

  • ईव्हीएम- 1,04,271 मते
  • पोस्टल- 1446 मते
  • एकूण- 1,07,717 मते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post