जाणून घ्या तुम्हाला करोना होऊन गेला आहे की नाही? नगर शहरात ॲंटिबॉडी तपासणी अभियान

 नगरमध्ये इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात १७ मे पासून   ॲंटिबॉडी तपासणी अभियाननगर: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण वाढत असले तरी हर्ड इम्युनिटीही तयार होत आहे. अनेकांमध्ये करोनाच्या ॲंटिबॉडीही तयार झालेल्या असू शकतात. यादृष्टीने नगर शहरात ८ विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत नागरिकांसाठी ॲंटिबॉडी तपासणी अभियान आयोजित केलं आहे. सोमवार दि.१७ मे पासून इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात ही ॲंटिबॉडी तपासणी सुविधा सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत उपलब्ध असेल. या तपासणीसाठी प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. थायरोकेअरची टिम ही तपासणी करणार आहे.


सकल राजस्थानी युवा मंच,

बडीसाजन ओसवाल युवक संघ, अहमदनगर होलसेल जॉगरी असोसिएशन,जय आनंद महावीर युवक मंडळ,सी.ए.असोसिएशन, नगर,जिनगर बॉईज,वर्धमान युवा संघ, माहेश्वरी युवा संघठन,महावीर प्रतिष्ठाण या संघटनांनी एकत्र येत नगरकरांसाठी हे अभियान हाती घेतले आहे. या टेस्टमध्ये शरीरात ॲंटिबॉडी आढळून आल्या तर तुम्हाला करोना होउन गेला आहे हे लक्षात येईल. तसेच पुढचे किमान ३ महिने नव्याने करोनाची बाधा होणार नाही याची बरीच शाश्वती मिळते. ज्या व्यक्तींमध्ये ॲंटिबॉडी टेस्टचा रिझल्ट १५ च्या पुढे असेल त्या व्यक्ती प्लाझ्मा दानही करू शकतील. ज्यांची ॲंटिबॉडी टेस्ट निगेटिव्ह येईल त्यांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे म्हणजे त्यांच्यातही ॲंटिबॉडी निर्माण होण्यास मदत होईल. या अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त नागरिकांनी ॲंटिबॉडी तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post