पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या मनपाच्या निर्णयावर नगरकरांमधून नाराजीचा सूर

 पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या मनपाच्या निर्णयावर नगरकरांमधून नाराजीचा सूरनगर: १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर नगर महापालिकेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरात किराणा, भाजीपाला विक्री मर्यादित वेळेसाठी खुली केली. पण दोनच दिवसात महापालिका आयुक्तांनी नव्याने आदेश जारी करत पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे नगर शहरात फक्त वैद्यकीय सेवा व दूध विक्री चालू असणार आहेत. महापालिकेच्या या निर्णयावर नगरकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनपा आयुक्त वरिष्ठांना खुष करण्यासाठी सामान्यांचा बळीचा बकरा बनवत आहेत अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. नगर परिसरातील शेतकरीही या निर्बंधांमुळे हैराण झाले आहेत. 

सोशल मीडियावर खालील मजकूर व्हायरल झाला असून यातील मुद्द्यांचे जोरदार समर्थन केले जात आहे.

माननीय साहेब,

तुम्ही २०० corona केसेस साठी नगर शहरात अचानक सरसकट लॉक डाउन जाहीर केला. तुम्ही सरसकट लॉक डाउन लावण्याच्या आधी ५ मिनिट विचार तर करा.तुम्हचे म्हणणे आहे कि लोकांनी २ दिवस गर्दी केली .अहो साहेब १५ दिवस कडक लॉक डाउन असेल तर साहजिक आहे भाजीपाला व किराणा साठी २ दिवस गर्दी होणार. पण तुम्ही तुमच्या वरच्या लोकांना इंप्रेस करण्याच्या चक्कर मध्ये आम्हा सामान्य माणसाला का बळीचा बकरा बनवत आहात ?.लोक सहन करतात म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेत आहात. अहो विचार करा किती लोक १ एप्रिल पासून घरी बसले आहे,किती लोकांचा पगार बंद आहे. किती व्यापारी लोकांचे कंबरडे मोडले आहे.आमचे हफ्ते कसे भरायचे,व्यापारी लोकांनी भाडे कसे भरायचे,शेतकऱ्यांनी कुठे जायचे ? .एकदा बेरोजगारीचे आकडे तर चेक करा. फक्त AC ऑफिस मध्ये बसून निर्णय घ्यायचा कोणासाठी ? कशासाठी ? ग्राउंड लेवल वर येऊन विचार करा मग समजेल लोकांचे किती हाल चालू आहेत.तुम्हाला हाथ जोडून विनंती आहे एकदा पुन्हा विचार करा . तुमचा इगो बाजूला ठेवून आधी समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करा .


हताश झालेला ,

सामान्य नागरिक

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post