नगर शहरात कडक निर्बंध आणखी काही दिवस वाढवणार?

 

नगर शहरात कडक निर्बंध पुन्हा वाढवणार? महापालिकेच्या निर्णयाकडे लक्षअहमदनगर- नगर शहरामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कोरोना चा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे. या कडक निर्बंधांची मुदत  10 मे  रोजी मध्यरात्री 12 वाजता संपत आहे. मधल्या काळात नगर शहरात रूग्णसंख्या कमी झाली असली तरी अपेक्षित करोना अपेक्षा इतक्या प्रमाणात कमी झालेला नाही. त्यामुळे आताचे कडक निर्बंध कायम राहणार की काही सवलती मिळणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. कडक निर्बंधांमुळे शहरात भाजीपाला, किराणा विक्री संपूर्ण बंद आहे. फक्त मेडिकल सेवा व दूध विक्री चालू आहे.  त्यामुळे आता कडक निर्बंध आणखी काही दिवस वाढवणार की नाही याबाबत महानगर पालिका कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post