लॉकडाऊनमध्ये शेतात मांडला जुगाराचा डाव...२९ जण ताब्यात

लॉकडाऊनमध्ये शेतात मांडला जुगाराचा डाव...२९ जण ताब्यात अकोला : अकोल्यातील गायगांव शेत शिवारातील प्रकाश वानखड़े यांच्या शिवारात शेतात खुलेआम चालणाऱ्या जुगराच्या क्लबवर छापा टाकण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणाहुन १५ लाखांवर मुद्देमाल जप्त केला असून २९ जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई विशेष पथकाच्या पीएसआय स्वाती इथापे यांनी केली आहे..

अकोल्यातील गायगांव शेत शिवारातील प्रकाश वानखड़े यांच्या शेतात खुलेआम जुगार क्लब सुरु आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारच्या सुमारास या जुगार क्लबवर छापा टाकला.

या कारवाई दरम्यान तब्बल २९ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम २ लाख रुपये, १३ मोटर सायकली व चारचाकी वाहन होंडा सीटी आणि जुगार साहित्य असा एकत्रित १५ लाख रूपयांचा जुगाराचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post