लॉकडाऊनमध्येही लाचखोरी कायम....५ हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

लॉकडाऊनमध्येही लाचखोरी कायम....५  हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात नगर: तक्रारदार यांचे साडु व त्यांचे दोन मुलांचे विरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात दोन आरोपी विरुद्ध चॅप्टर केस  लवकर करुन त्यांचा लगेच जामीन करुन देणे साठी व त्यातील उर्वरित एक आरोपी चे विरुद्ध चॅप्टर केस न करता त्याचे नाव गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी    5,000 रु.लाचेची मागणी करून ती स्विकारताना पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. संदिप भाऊसाहेब पांडे,(  वय  वर्ष,33,  पोलीस नाईक  ब.नं. 1681 नेमणूक - अकोला पोलीस स्टेशन, अहमदनगर. वर्ग - 3)  असं आरोपीचं नाव असून नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.


▶️ *सापळा अधिकारी* =

दिपक करांडे, पोलिस निरीक्षक

 ला.प्र.वि, अहमदनगर

▶️ *सुपरविजन अधिकारी* - हरिष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर

▶ **मार्गदर्शक* -*1)मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

2)मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

3) मा. विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* -  मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post