वाळू वाहतुकदाराकडून लाच... तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

वाळू वाहतुकदाराकडून लाच... तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल नगर: तक्रारदार यांची वाळूची ट्रक सोडण्यासाठी लाच मागणारे उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगाव  कार्यालय येथे कार्यरत तीन पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. तिघांनी दि.7/4/2021 रोजी वाळू ट्रक पकडली. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचे मोबदल्यात व वाळु वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून दि.07/04/2021 रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील  तिन्ही लोकसेवक यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15000/-  लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार वसंत कान्हु फुलमाळी,( पो कॉन्स्टेबल, ब.न.1808, वर्ग 3 नेमणूक -उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर), संदिप वसंत चव्हाण, (पो कॉन्स्टेबल, ब.न. 566, वर्ग-3), कैलास नारायण पवार ( पो. कॉन्स्टेबल, ब.न.2798, वर्ग -3नेमणूक-शेवगाव पोलीस स्टेशन)  यांच्याविरुद्ध शेवगाव पो स्टे येथे गुन्हा दाखल केला असून नमूद आरोपी लोकसेवक फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे.

▶️ *सापळा अधिकारी* 

श्याम पवरे, पोलीस निरीक्षक

ला.प्र.वि.अहमदनगर

 ▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** 

हरिष खेडकर, पोलीस उप अधीक्षक

ला.प्र.वि.अहमदनगर

▶ **मार्गदर्शक* -

*मा.श्री सुनील कडासने सो.* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक 

*मा.श्री निलेश सोनवणे सो.* 

अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक 

मा. श्री.विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. नाशिक

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* -  मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post