नगरमध्ये १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण... मनपाकडून केंद्रांची यादी जाहीर

 


अहमदनगर महानगरपालिकेला वयोगट १८ ते ४४ असणाऱ्या नागरिकांसाठी १०००० लस उपलब्ध. दिनांक १ मे २०२१ पासून लसीकरणास प्रारंभ झाला आहे.

को विन (Co win) ऍपवर पूर्वनोंदनी केलेल्या वयोगट १८ ते ४४ असणाऱ्या नागरिकांना १ मे २०२१ पासून सकाळी १० ते ४.३० या वेळेत मनपाच्या पुढील आरोग्य केंद्रावर लसीकरण मिळणार आहे 

केडगाव नागरी आरोग्यकेंद्र,जिजामाता नागरी आरोग्यकेंद्र, महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र,नागापूर नागरी आरोग्य केंद्र,मुकुंदनगर नागरी आरोग्यकेंद्र


वयोगट १८ ते ४५ साठी

१)प्रत्येक केंद्रावर प्रतिदिवस ३०० लस उपलब्ध 

२)पूर्व नोंदणी केलेल्या नागरिकांनाच मिळणार लस

३)लसीकरणासाठी नागरिकांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक 

४)नोंदणी फक्त ऑनलाइन co win या अँप द्वारे करावी केंद्रावर नोंदणी केली जाणार नाही याची नोंद घ्यावी 


वयोगट ४५ व त्यापुढील नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस हा फक्त तोफखाना नागरी आरोग्यकेंद्र व सावेडी (सिव्हिल) नागरी आरोग्यकेंद्र येथे मिळणार आहे0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post