रूग्णांसाठी फिरोदिया हायस्कूलच्या 1995च्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन उपलब्ध

 गरजू रूग्णांसाठी फिरोदिया हायस्कूलच्या 1995च्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन उपलब्ध


प्रत्येकाने जबाबदारी समजून मदतीचा हात दिला तर करोनाला हरवणे शक्य - अमित मुथानगर: आताच्या करोना संकटावर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. रूग्णसंख्या प्रचंड वाढली असून ऑक्सिजनची कमतरता आहे. अत्यवस्थ रूग्णांना बेड उपलब्ध होईपर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपयुक्त ठरू शकतो. हीच बाब ओळखून २ मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने जबाबदारी समजून मदतीचा हात पुढे केला तर करोनाला हद्दपार करण्यात नक्की यश मिळेल असा विश्वास अहमदनगर मर्चंटस बॅंकेचे संचालक अमित मुथा यांनी व्यक्त केला.
नगरमधील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील १९९५ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन विकत घेऊन त्या गरजूंसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सदर मशिनच्या लोकार्पणावेळी मुथा बोलत होते. यावेळी राहुल जामगावकर, रविकांत काबरा, शैलेश गवळी आदी उपस्थित होते.
१९९५च्या बॅचच्या ग्रुपमध्ये ३८० माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी आहेत. आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेले हे शाळा सोबती सोशल मिडिया द्वारे संपर्क राखून आहेत. ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच एकमेकांच्या अडीअडचणीत मदत केली जाते. सध्या करोना महामारीने थैमान घातले आहे. रूग्णांना उपचार मिळवून देताना नातेवाईकांची प्रचंड धावपळ होते. ही बाब लक्षात घेऊन ग्रुपच्या सदस्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन खरेदी केल्या आहेत. २ हजार रुपये रिफंडेबल डिपॉझिट घेऊन सदर मशिन नगर शहरातील रूग्णांना ३ दिवसांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  अतिशय कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचे जामगावकर यांनी सांगितले. मशिन साठी गरजूंनी राहुल जामगावकर (9850091155), रविकांत काबरा (9225122151) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post