रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांच्या पुढे, आज 'इतक्या' हजार रूग्णांना डिस्चार्ज

*दिनांक २२ मे, २०२१*


*आज ३०४८ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या १८५६ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२७ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज ३०४८ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २७ हजार ६०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६ हजार ३१५ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६९ आणि अँटीजेन चाचणीत ८४७ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०७, नेवासा २२, पारनेर १२, पाथर्डी ०७, राहता ०४, राहुरी १०, संगमनेर ०५, शेवगाव ०१, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर ४२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८४, अकोले १५९, जामखेड ०३, कर्जत ०८, कोपरगाव १३, नगर ग्रा.४६,  नेवासा २०,  पारनेर ३१, पाथर्डी १६, राहाता ४६,  राहुरी ९५, संगमनेर २५१, शेवगाव ०९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ५९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ८४७ जण बाधित आढळुन आले. मनपा ४१, अकोले ४४,  जामखेड २५, कर्जत ८३, कोपरगाव ५५, नगर ग्रा. ४२, नेवासा ५०, पारनेर ७३, पाथर्डी ९३,  राहाता ३६, राहुरी ८०, संगमनेर ९८, शेवगाव ३७, श्रीगोंदा ४०, श्रीरामपूर ४७ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा २९५, अकोले १३६, जामखेड ३६, कर्जत १३१,  कोपरगाव २१४, नगर ग्रामीण ४६२, नेवासा १५०, पारनेर १३०, पाथर्डी २६२, राहाता २०३, राहुरी १६७, संगमनेर १६१,  शेवगाव १२८,  श्रीगोंदा १०९,  श्रीरामपूर ३९०, कॅन्टोन्मेंट १५, मिलिटरी हॉस्पिटल ०५ आणि इतर जिल्हा ५२ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:२,२७,६०४*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:१६३१५*


*मृत्यू:२७४६*


*एकूण रूग्ण संख्या:२,४६,६६५*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post