5 G टॉवर टेस्टिंगमुळे देशात करोनाचा उद्रेक! समोर आला मोठा खुलासा

 5 G टॉवर टेस्टिंगमुळे देशात करोनाचा उद्रेक! समोर आला मोठा खुलासानवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये वेगाने वाढणाऱ्या कोरोना संक्रमणासाठी ५ जी टेस्टिंगशी जोडलेला दावा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा केलाय की, भारतात सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट पसरली आहे. यात जितक्या संख्येने मृत्यू होत आहेत. त्यासाठी कोणताही आजार कारणीभूत नाही तर ५ जी टॉवरच्या टेस्टिंगमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशन जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.

सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, सोशल मीडियावरील काही मेसेज आणि काही वृत्तपत्रात ५ जी स्पेक्ट्रम चाचणीमुळे देशात कोरोना झपाट्याने पसरत असल्याचा दावा केला आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आणि निराधार असून यात काहीही तथ्य नाही. अशाप्रकारच्या चुकीच्या दाव्यावर विश्वास ठेऊ नये. जगातील अनेक देशात ५ जी नेटवर्कची सुरुवात याआधीच झाली आहे. लोक सुरक्षितपणे या सुविधांचा वापर करत आहेत. इतकचं नाही तर ५ जी नेटवर्क आणि कोविड १९ यात कोणताही संबंध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केलं असल्याचं सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक एस. पी कोच्चर यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post