सकारात्मक.... जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे चांगले प्रमाण कायम

 दिनांक २३ मे, २०२१

आज २७९९ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या १८५१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७१ टक्केअहमदनगर: जिल्ह्यात आज २७९९ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३० हजार ४०३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५ हजार २८४ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३७०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९३ आणि अँटीजेन चाचणीत ९८८ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ७६, जामखेड ०५, कर्जत २५, कोपरगाव २४, नगर ग्रामीण ४९, नेवासा ११, पारनेर ०४, पाथर्डी ४८, राहता १२, राहुरी ०३, संगमनेर ६२, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ०६, कॅंटोन्मेंट ०६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९२, अकोले २२, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव १६, नगर ग्रा.५६,  नेवासा ३७,  पारनेर ३२, पाथर्डी १४, राहाता ४२,  राहुरी ४९, संगमनेर ६०, शेवगाव ०५, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ९८८ जण बाधित आढळुन आले. मनपा ३१, अकोले ५७,  जामखेड २९, कर्जत ५९, कोपरगाव ८२, नगर ग्रा. ६८, नेवासा ६३, पारनेर १४५, पाथर्डी ६५,  राहाता ३७, राहुरी ५९, संगमनेर ९८, शेवगाव ३८, श्रीगोंदा १०७, श्रीरामपूर ४७, कॅंटोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा १४५, अकोले १६४, जामखेड १४१, कर्जत २०८,  कोपरगाव १५२, नगर ग्रामीण २५४, नेवासा १८७, पारनेर १५८, पाथर्डी १६१, राहाता १६१, राहुरी १७२, संगमनेर ३०८,  शेवगाव १८१,  श्रीगोंदा १८७,  श्रीरामपूर १६३, कॅन्टोन्मेंट १०, इतर जिल्हा ४६ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:२,३०,४०३


उपचार सुरू असलेले रूग्ण:१५२८४


मृत्यू:२८२९


एकूण रूग्ण संख्या:२,४८,५१६


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post