भारतात लॉन्च झाला पहिला हायब्रीड ट्रॅक्टर, क्लच, गियर नाही, इंधन खर्चात 50 टक्के बचत

 

भारतात लॉन्च झाला पहिला हायब्रीड ट्रॅक्टर, क्लच, गियर नाही, इंधन खर्चात 50 टक्के बचतमुंबई : Proxecto ने भारतातील पहिला हायब्रिड ट्रॅक्टर लाँच केला आहे, जो पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. या ऑटोमॅटिक हायब्रिड ट्रॅक्टरमध्ये बॅटरीसुद्धा नसणार आणि यामध्ये सुमारे 2 डझन अशी वैशिष्ट्ये आहेत जी या उद्योगात अद्याप लाँच झालेली नाहीत. HAV tractor प्रथम नोव्हेंबर 2019 मध्ये जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅग्रीटेक इव्हेंटमध्ये सादर करण्यात होता. हा कार्यक्रम जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून या ट्रॅक्टरची आतुरतेने वाट पाहिली जात होती.

ट्रॅक्टरमध्ये दोन डझन अशी वैशिष्ट्ये आहेत जी पहिल्यांदाच वापरली गेली आहेत. हा एकमेव हायब्रीड ट्रॅक्टर आहे ज्यात बॅटरी वापरण्यात आलेली नाही. हा ट्रॅक्टर डिझेल आणि सीएनजी दोन्हीवर चालू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यावर, हाच ट्रॅक्टर नंतर सहजपणे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित करता येईल. AWED Technology मुळे या ट्रॅक्टरची सर्व चाके इलेक्ट्रिक ड्राइव्ह करतात. ज्यामुळे वाहन चालविणे अगदी स्मूद होते. यामध्ये क्लच किंवा गियर नाही. केवळ फॉरवर्ड, न्यूट्रल आणि रिव्हर्सचा पर्याय देण्यात आला आहे.

Diesel Hybrid S1 मॉडल हे पारंपारिक ट्रॅक्टरच्या तुलनेत 28 टक्के कमी इंधन वापरते. S 2 CNG Hybrid मॉडेल जवळपास 50 टक्के कमी इंधन वापरते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post