गुड न्यूज.... जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचा सर्वोच्च विक्रम

 *दिनांक ०८ मे, २०२१*


*आज ४१८२ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३६१२ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.०७ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज  ४१८२ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७७ हजार २८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३६१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६ हजार ४१९ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०१८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४५ आणि अँटीजेन चाचणीत ६४९ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, अकोले १७०, जामखेड ०१, कर्जत १०७, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ४६, नेवासा ९८, पारनेर ९४, पाथर्डी १३८, राहता ९२, राहुरी ५६, संगमनेर ७८, शेवगाव ०२, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ५१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०६, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४५, अकोले १९०, जामखेड ११, कर्जत २३, कोपरगाव ७२, नगर ग्रामीण १९९, नेवासा १२०,  पारनेर ७०, पाथर्डी ३१, राहाता १२८,  राहुरी ७५, संगमनेर ३६१, शेवगाव २४, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर १४३, कॅंटोन्मेंट बोर्ड ५२ आणि इतर जिल्हा ५३ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ६४९ जण बाधित आढळुन आले. मनपा ५४, अकोले ०४,  जामखेड ०१, कर्जत ९७, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण २९, नेवासा २३, पारनेर ९१,  पाथर्डी २४,  राहाता १५, राहुरी १३३, संगमनेर ०३, शेवगाव १२ श्रीगोंदा ६६, श्रीरामपूर ३५ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ८१२, अकोले १०७, जामखेड १२६, कर्जत ३५,  कोपरगाव २५७, नगर ग्रामीण ४७५, नेवासा २०५, पारनेर २४७, पाथर्डी १६२, राहाता ३५४, राहुरी २४३, संगमनेर ३७७,  शेवगाव ६६,  श्रीगोंदा २६३,  श्रीरामपूर २५२, कॅन्टोन्मेंट ६३, मिलिटरी हॉस्पिटल ०१,  इतर जिल्हा १३२ आणि इतर राज्य ०५  अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:१,७७,२८६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२६१४९*

*मृत्यू:२२८२*

*एकूण रूग्ण संख्या:२,०५,९८७*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post