नगरकरांची 'इम्युनिटी' वाढतेय...बाधितांपेक्षा बरे होणारे दुप्पट

 *दिनांक २० मे, २०२१*


*आज ४१०७ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या २६३७ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३७ टक्के*



अहमदनगर: जिल्ह्यात आज ४१०७ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २६३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८ हजार ६०५ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८८ आणि अँटीजेन चाचणीत १३२८ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ६०, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ६०, पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहता ०३, राहुरी १९, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०३, कॅंटोन्मेंट १३ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२०, अकोले २३, जामखेड ८१, कर्जत १०, कोपरगाव २२, नगर ग्रा.७१,  नेवासा ७१,  पारनेर ९३, पाथर्डी ७४, राहाता ६७,  राहुरी ३६, संगमनेर ९९, शेवगाव १५५, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ११७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८ आणि इतर जिल्हा २१ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १३२८ जण बाधित आढळुन आले. मनपा २१, अकोले ५८,  जामखेड ४७, कर्जत ४८, कोपरगाव ६९, नगर ग्रा. ५३, नेवासा ८०, पारनेर १३६, पाथर्डी १०१,  राहाता ६५, राहुरी ६७, संगमनेर १७३, शेवगाव ६०, श्रीगोंदा २७४, श्रीरामपूर ६५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ६७१, अकोले १४४, जामखेड १०७, कर्जत २०४,  कोपरगाव ३१९, नगर ग्रामीण ३५७, नेवासा २०१, पारनेर ३३२, पाथर्डी १६४, राहाता २६२, राहुरी २६०, संगमनेर २०९,  शेवगाव १९८,  श्रीगोंदा ४३५,  श्रीरामपूर ६१, कॅन्टोन्मेंट ४७, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १३२ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:२,२१,१३७*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:१८६०५*


*मृत्यू:२५७५*


*एकूण रूग्ण संख्या:२,४२,३१७*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post