हनीट्रॅप प्रकरण...‘तिने’ मागितले 3 कोटी, बड्या अधिकार्‍याची फिर्याद

हनीट्रॅप प्रकरण...‘तिने’ मागितले 3 कोटी, बड्या अधिकार्‍याची फिर्याद नगर - तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमध्ये एका बड्या अधिकाऱ्यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अधिकार्‍याकडे तीन कोटींची खंडणी त्या तरूणीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्‍याने कबूल केले होते. त्यातील 80 हजार रूपये त्याने दिले होते. त्यांच्या सोबत नाजूक संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये संबंधित तरूणीसह एजंट अमोल मोरे, सचिन खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील  व अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल . उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप व पथकातील पो उप.नि. आर एन राऊत , धनराज जारवाल , पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे , संतोष लगड , पो.ना योगेश ठाणगे , भानुदास सोनवणे पो.कॉ धर्मराज दहिफळे , संभाजी बोराडे यांनी सदरची कारवाई केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप हे करत आहे0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post