जिल्ह्यासाठी सुपर संडे....बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त

 *दिनांक ०९ मे, २०२१*


*आज ३७९९ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३३२७ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३७९९ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८१ हजार ०८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५ हजार ९२८ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२२०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४१५ आणि अँटीजेन चाचणीत ६९२ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६५, अकोले २२, जामखेड २२१, कर्जत ५३, कोपरगाव १८, नगर ग्रामीण ९७, नेवासा ९९, पारनेर ७८, पाथर्डी १०३, राहता २१, राहुरी १३, संगमनेर १९, शेवगाव २६९, श्रीगोंदा ७३, श्रीरामपूर ३०, कॅंटोन्मेंट बोर्ड १३ आणि इतर जिल्हा २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २७७, अकोले ३०, जामखेड ०५, कर्जत १३, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण १९९, नेवासा ७३,  पारनेर ५७, पाथर्डी २१, राहाता २४६,  राहुरी ५७, संगमनेर १५८, शेवगाव ३३, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर ९९, कॅंटोन्मेंट बोर्ड ११ आणि इतर जिल्हा ३४ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ६९२ जण बाधित आढळुन आले. मनपा ७९, अकोले ०१,  जामखेड ४९, कर्जत ४३, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण ४६, नेवासा ४१, पारनेर ६१,  पाथर्डी ५१,  राहाता २९, राहुरी १०३, संगमनेर १३, शेवगाव २५ श्रीगोंदा ६४, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ५४४, अकोले १९२, जामखेड १३, कर्जत २६७,  कोपरगाव २०९, नगर ग्रामीण ३१६, नेवासा १६९, पारनेर १९८, पाथर्डी १२७, राहाता २५९, राहुरी १८३, संगमनेर ५६६,  शेवगाव १५५,  श्रीगोंदा ३४६,  श्रीरामपूर १०३, कॅन्टोन्मेंट ६१, मिलिटरी हॉस्पिटल १४,  इतर जिल्हा ७३ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:१,८१,०८५*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:२५९२८*


*मृत्यू:२३०१*


*एकूण रूग्ण संख्या:२,०९,३१४*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post