मोठा दिलासा...आज 'इतक्या'हजार रूग्णांना डिस्चार्ज

 दिनांक १५ मे, २०२१

आज ३५९२ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३१४४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.११ टक्के

अहमदनगर: जिल्ह्यात आज ३५९२ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ०३ हजार ८४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३१४४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ४६१ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८१७ आणि अँटीजेन चाचणीत ११८० रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७, जामखेड ०१, कर्जत २३, कोपरगाव १५, नगर ग्रामीण १५, नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०३, राहुरी १८, संगमनेर ०२, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ०५,  कॅंटोन्मेंट बोर्ड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०५ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४०, अकोले ०८, जामखेड २३, कर्जत २०, कोपरगाव १६३, नगर ग्रामीण ३६१, नेवासा १०२,  पारनेर २९, पाथर्डी ७५, राहाता १४९,  राहुरी ६९, संगमनेर ९५, शेवगाव ८६, श्रीगोंदा ३२, श्रीरामपूर ३१५, कॅंटोन्मेंट बोर्ड ०६, इतर जिल्हा ४२ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ११८० जण बाधित आढळुन आले. मनपा ३९, अकोले १३१,  जामखेड १२, कर्जत ९५, कोपरगाव ५७, नगर ग्रामीण ८९, नेवासा ४७, पारनेर १०५, पाथर्डी १८६,  राहाता ६४, राहुरी ८८, संगमनेर ६६, शेवगाव ४५, श्रीगोंदा ६६, श्रीरामपूर ७१, कॅंटोन्मेंट ०८ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ४२४, अकोले ३६४, जामखेड १३, कर्जत २२७,  कोपरगाव १४६, नगर ग्रामीण २७०, नेवासा २४१, पारनेर २५४, पाथर्डी १९३, राहाता २३३, राहुरी २६३, संगमनेर ४४०,  शेवगाव ३६,  श्रीगोंदा १२१,  श्रीरामपूर २२६, कॅन्टोन्मेंट ५८, मिलिटरी हॉस्पिटल १५,  इतर जिल्हा ६४ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:२,०३,८४२


उपचार सुरू असलेले रूग्ण:२२४६१


मृत्यू:२४५०


एकूण रूग्ण संख्या:२,२८,७५३


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post