नगरचा रिकव्हरी रेट ९० टक्क्याजवळ...बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त

 *दिनांक १६ मे, २०२१*


*आज ३२९६ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या २८८२ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४२ टक्के*



अहमदनगर: जिल्ह्यात आज ३२९६ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ०७ हजार १३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.४२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८८२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ०१६ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४०८ आणि अँटीजेन चाचणीत १२५० रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, कर्जत १०, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ३६, नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०३, राहता ०२, राहुरी २९, संगमनेर ०१, श्रीगोंदा ६९, श्रीरामपूर ०५,  कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९०, अकोले ९६, जामखेड ७८, कर्जत ४८, कोपरगाव ३६, नगर ग्रामीण १४८, नेवासा १०७,  पारनेर ८५, पाथर्डी ४१, राहाता ९०,  राहुरी ३९, संगमनेर २४२, शेवगाव १२८, श्रीगोंदा ३५, श्रीरामपूर १०४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, इतर जिल्हा ३८ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १२५० जण बाधित आढळुन आले. मनपा ५९, अकोले ६८,  जामखेड ६४, कर्जत १५१, कोपरगाव ८६, नगर ग्रामीण ८६, नेवासा ७८, पारनेर ७४, पाथर्डी १२१,  राहाता ७०, राहुरी ११०, संगमनेर ६७, शेवगाव ६०, श्रीगोंदा ८६, श्रीरामपूर ५९, कॅंटोन्मेंट ०६ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ४१९, अकोले ५३, जामखेड २७५, कर्जत १०९,  कोपरगाव १२८, नगर ग्रामीण ३३७, नेवासा २१२, पारनेर १९५, पाथर्डी १६८, राहाता २९५, राहुरी १७१, संगमनेर १९०,  शेवगाव ३२१,  श्रीगोंदा १६६,  श्रीरामपूर १६४, कॅन्टोन्मेंट २५, इतर जिल्हा ६४ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:२,०७,१३८*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:२२०१६*


*मृत्यू:२४८१*


*एकूण रूग्ण संख्या:२,३१,६३५*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post