नगर शहराला दिलासा कायम...पण जिल्ह्यात रूग्णवाढ चिंताजनक

 


नगर शहराला दिलासा कायम...पण जिल्ह्यात रूग्णवाढ चिंताजनकनगर : नगर शहरासह जिल्ह्यात नवीन करोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी वाढीचा आलेख कायम असल्याने चिंताजनक परिस्थिती कायम आहे.  चोवीस तासात जिल्ह्यात 2882 नवीन बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधिक 310 रूग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत. नगर शहरात करोनाचा आलेख घसरणीला लागला असून गेल्या महिनाभरानंतर प्रथमच मनपा हद्दीत 200 हून कमी रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर- 310

नगर ग्रामीण - 270

कर्जत- 209

श्रीगोंदा -190

नेवासा - 188

राहुरी - 178

शेवगाव - 188

नगर मनपा शहर - 174

श्रीरामपूर - 168

पाथर्डी - 168

अकोले - 165

राहाता - 164

पारनेर - 162

कोपरगाव - 160

जामखेड - 142

इतर जिल्हा - 47

भिंगार कॅन्टान्मेंट - 12

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 224, खासगी लॅबमध्ये 1408 तर अँटीजेन चाचणीत 1250 करोनाबाधित आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post