रेड झोन जिल्ह्यात 1 जून नंतरही कडक लॉकडाऊन कायम.... नगर जिल्हा...


राज्यात रेड झोन जिल्ह्यात 1 जून नंतरही कडक लॉकडाऊन कायम.... नगर जिल्हाही रेड झोनमध्ये मुंबई : राज्यात करोनाची रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आता १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. इतकंच नाहीतर राज्यात रेड झोन असलेल्या १४ जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी नियम शिथिल करण्यात येणार आहेत.या जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असलं तरी करोनाच्या रुग्णांध्ये घट होताना दिसत नाही. त्यामुळे हे १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येतील. 

राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये

अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post