करोनाचा प्रादुर्भाव....मिनी मंत्रालयात अभ्यागतांना ‘नो एंट्री’

 करोनाचा प्रादुर्भाव....मिनी मंत्रालयात अभ्यागतांना ‘नो एंट्री’



नगर : कोविड 19 चा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला असून नगर जिल्हा परिषद मुख्यालयातही अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत अभ्यागतांना पुन्हा नो एंट्री करण्यात आली आहे. महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त अधिकारी, कर्मचारी सोडून कोणालाही जिल्हा परिषद मुख्यालयात प्रवेश देण्यात येत नाही. जास्तीत जास्त कामे टपालाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून प्रवेशव्दारावरच अभ्यागतांना अडवून माहिती घेण्यात येत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post