नगरमध्ये आता आधुनिक झाडू मशिनने साफसफाई, 1 तासात 8 किलोमीटर रस्ता झाडणार...

 आधुनिक तंत्रज्ञानयुक्‍त झाडू साफ सफाई मशिन लवकरच शहरात दाखल होणार –

स्‍वच्‍छतेतून नागरिकांचे आरोग्‍य सदृढ व निरोगी राहण्‍यास मदत होते.- महापौर बाबासाहेब वाकळे



नगर -  स्‍वच्‍छ सुंदर हरित शहर करण्‍यासाठी गेली दोन वर्षापासून स्‍वच्‍छते संदर्भात प्रयत्‍न सुरू केल्‍यामुळे स्‍वच्‍छ भारत अभियानामध्‍ये नगर शहराला थ्री स्‍टार मानांकन मिळाले आहे आताही यावर्षी फाईव्‍ह स्‍टार मानांकनासाठी स्‍वच्‍छतेचे काम केले आहे. स्‍वच्‍छतेच्‍या माध्‍यमातून नागरिकांचे आरोग्‍य सदृढ व निरोगी राहण्‍यास मदत होत आहे. दिवसें दिवस मनपाच्‍या घनकचरा विभागातील कर्मचा-यांच्‍या अपु-या संख्‍येमुळे नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न सोडविण्‍यास उशीर होत आहे.यासाठी नगर शहरातील कचरा, धुळ, गोळा करण्‍यासाठी झाडू सफाई मशिन लवकरच शहरात काम करणार आहे. ही मशिन आधुनिक तंत्रज्ञानाची असून एक तासामध्‍ये सुमारे आठ कि.मी. रस्‍त्‍याची साफसफाई करणार असल्‍याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

      पारिजात चौक येथे चॅलेंजर सुपर प्राव्‍हेट लि. कंपनीची आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्‍त अशी झाडू सफाई मशिनद्वारे प्रायोगिक तत्‍वावर साफ सफाईची पाहणी  करताना आ. संग्रामभैय्या जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्‍त शंकर गोरे, स्‍थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेता संपत बारस्‍कर, सभागृह नेते रविंद्र बारस्‍कर, नगरसेवक स्‍वप्निल शिंदे, रामदास आंधळे, उपायुक्‍त यशवंत डांगे, राष्‍ट्रवादी विधानसभा अध्‍यक्ष सुमित कुलकर्णी, भाजपा प्रसिध्‍दी प्रमुख अमित गटणे, सचिन जगताप, उदयोजक रोहन सानप, विनोद पाचारणे, ऋषिकेश देशमुख,प्रशांत चौधरी, महेश कु-हे, शिवा आढाव, शुभम वाकळे  आदी उपस्थित होते.                                                                                                                                                                                                                                                                    


      स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले म्‍हणाले की, दिवसे दिवसे मनपाचे स्‍वच्‍छता कर्मचारी सेवा निवृत्‍त होत असल्‍यामुळे साफ सफाईसाठी कर्मचारी कमी पडत आहेत. नगर शहराचा विस्‍तार दिवसे दिवस वाढत असल्‍याने लोकवस्‍ती वाढत आहे. त्‍यामुळै आधुनिक तंत्रज्ञानाची झाडू सफाई मशिनची अत्‍यंत गरज आहे. ही मशिन मुंबई पुना , इंदोर , अहमदाबाद ,सुरत ,नाशिक, या मनपात काम करित आहेत. आता ही मशिन नगर शहरातही दाखल होणार आहे. या मशिनद्वारे सुमारे 50 ते  60 कि.मी. रस्‍त्‍यांची साफ सफाई केली जाणार आहे. त्‍यामुळे कर्मचा-यांवरील साफसफाईचा ताण कमी होणार आहे. हया मशिनद्वारे साफ सफाई केलेला कचरा डंम्पिगद्वारे घंटागाडीत टाकण्‍याची सुविधा आहे.


      

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post