लसीकरणावरुन कलगीतुरा...आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढून प्रेस घेतली होती का?

लसीकरणावरुन कलगीतुरा...आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढून प्रेस घेतली होती का? सांगली – देशात तसेच राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेला सुरूवात होणार आहे. परंतु राज्यात लसीकरण मोहिमेवरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळच्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणार असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले . त्यानंतर संध्याकाळच्या ४ वाजताच्या पत्रकार परिषदेत लसीकरण १ मे पासून होणार नाही म्हणाले. मग सकाळची जी प्रेस घेतली ती गांजा ओढून घेतली का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे. पुरेशा लसीचा साठा नसल्याने राज्यात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले होते. त्यावर गोपीचंद पडळकरांनी टीकास्त्र सोडलं आहे. सकाळी आरोग्यमंत्री येत्या १ तारखेपासून १८ वर्षावरील लोकांचं लसीकरण करणार असं सांगतात. त्यानंतर ४ वाजता ती करता येणार नाही असं म्हणतात. हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचे. विचारसरणी एक नाही, कोणताही अजेंडा नसताना एकत्र आले आहेत अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post