लस घेण्यासाठी गर्दी...पण नगरमध्ये लसीचा तुटवडा, उन्हातान्हात ज्येष्ठ नागरिकांची परवड

 लस घेण्यासाठी गर्दी...पण नगरमध्ये लसीचा तुटवडा, उन्हातान्हात ज्येष्ठ नागरिकांची परवडनगर : केंद्र सरकार लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला देत आहे, पण लस पुरवठा करताना हात आखडता घेत आहे की काय अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे. नगरमध्ये मनपाच्या केंद्रांवर सध्या करोना लसीकरणाची व्यवस्था सुरु आहे. परंतु, याठिकाणी तासाभरातच लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही, असे बोर्ड लावण्यात येत आहे. आजही (दि.7 एप्रिल) सावेडीतील एका लसीकरण केंद्रावर सकाळी 10.30 वाजताच लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही असा बोर्ड लावण्यात आला. त्यामुळे उन्हातान्हात लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा परतावे लागले. सरकार एकीकडे करोना लसीकरणासाठी आवाहन करीत आहे, त्याचवेळी लसीकरणासाठी तयार असलेल्या नागरिकांना असे हेलपाटे मारावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post