तोफखान्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ, महापौर, उपमहापौरांनी घेतली धाव...

 

तोफखान्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ, महापौर, उपमहापौरांनी घेतली धाव...नगर -  महानगरपालिकेच्‍या माध्‍यमातून कोरोना संसर्ग विषाणूला रोखण्‍यासाठी रोग प्रतिकार  लसीकरणाचे काम मनपा आरोग्‍य केंद्रामध्‍ये सुरू आहे. लस घेण्‍यासाठी या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिकांची  गर्दी होत आहे. त्‍यामुळे आरोग्‍य विभागातील कर्मचा-यांना काम करण्‍यास अडथळा निर्माण होत आहे. आज तोफखाना येथील आरोग्‍य येथे नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली असल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये गोंधळ उडाला होता. यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांना गोंधळ उडाल्‍याची बातमी  समजताच लगेच त्‍यांनी आरोग्‍य केंद्रावर जावून नागरिकांना संयमाची भुमीका पार पाडावी अशी विनंती यावेळी नागरिकांना केली. बंद पडलेले लसीकरण पुन्‍हा सुरू झाले. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्‍या आईचे नुकतेच निधन झाले तरीही आपले दु:ख विसरून नागरिकांच्‍या आरोग्‍याच्‍या विषयाला प्राधान्‍यक्रम दिला. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, अजय ढोणे, संजय ढोणे, .विकास गिते, पुष्‍कर कुलकर्णी , .शिवा आढाव, शुभम वाकळे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post