..तर तीन दिवसांनी लसीकरण ठप्प होईल - आरोग्यमंत्री राजेश टोपे

..तर तीन दिवसांनी लसीकरण  ठप्प होईल - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : 14 लाख लसी उपलब्ध आहेत. हा तीन दिवसांचा स्टॉक आहे. तीन दिवसांनी लसीकरण  ठप्प होईल. दर आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा केला पाहिजे.केंद्र लस पाठवतात पण गती कमी आहे. जसं सांगितलं जातंय तसा पुरवठा होत नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपेयांनी सांगितले. 

अनेक ठिकाणी लस नाही, अनेक जिल्ह्यात लस नाही म्हणून केंद्र बंद करावी लागत आहेत. या परिस्थिती कुणीच राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

केंद्राच्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या आहेत. केंद्राकडून आम्हाला काही अपेक्षा आहेत.आम्ही ३ लाख दररोज लसीकरण करत होतं ते ६ लाख करा असं सांगितलं. आज आम्ही ४.५ लाखापर्यंत पोहचलो पण लस नाही म्हणून आम्हाला काही लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. लस नाही म्हणून  अनेक केंद्रावरून लोकांना आम्ही परत पाठवत आहोत. लसीचा पुरवठा करा असं आम्ही केंद्राकडे वारंवार सांगतोय असे ते म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post