‘त्यांच्या’ आरोपांना महत्त्व देत नाही : ना.बाळासाहेब थोरात

विखेंच्या आरोपांना महत्त्व देत नाही : ना.बाळासाहेब थोरात

 


संगमनेर: राज्यातील कोरोनाची स्थिती, लसींचा तुटवडा, ऑक्सिजन व बेड्सची कमतरता यांवरून भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकरावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही, असा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. ते पत्रकारांशी बोलत होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काय आरोप केले त्याला महत्त्व देत नाही. ते त्यांची आरोप करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाचा संसर्ग केवळ एकट्या नगरमध्येच नाही तर सर्वत्र हीच परिस्थिती आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही, असे थोरात म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post