शिक्षकांचे आधी लसीकरण करा...मगच सर्वेक्षणाचे काम सोपवा

 विना लसीकरणासह कोरोना कुटुंब  सर्वेक्षण ==कोरोना साखळी वेगाने वाढण्याचा गंभीर धोका     अहमदनगर जिल्ह्यात दिनांक 28 एप्रिल2021ते दिनांक 2मे 2021 या कालावधीमध्ये मा.विभागीय आयुक्त नाशिक यांचे आदेशान्वये कुटुंब सर्वेक्षण होणार आहे.
     सदरील सर्वेक्षणामध्ये अंगणवाडी सेविका ,आशा कर्मचारी व शिक्षक यांचा समावेश असून शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही .आज पर्यंत जिल्ह्यात 25 ते 30 शिक्षक कोरोनाआजाराने मृत्युमुखी पडलेले असून शेकडो शिक्षकांवर उपचार चालू आहेत.
     सर्वेक्षणामध्ये सदरील सर्वेक्षणामध्ये कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा ताप, लक्षणे इत्यादी तपासणी करावयाची आहेत आपल्या जिल्ह्यात शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही त्यामुळे सद्यस्थितीत शिक्षकांकडून सर्वेक्षण झाल्यास काही पॉझिटिव्ह शिक्षकांकडून गावांमध्ये संसर्ग पोहोचण्याचा तसेच गावातील पॉझिटिव व्यक्तींकडून शिक्षकांमार्फत यांच्या कुटुंबापर्यंत संसर्ग होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे .
    शिक्षकांनी आतापर्यंत कधीही राष्ट्रीय काम नाकारलेले नाही प्रत्येक आपत्तीच्या वेळेस शिक्षकांनी नेहमीच साथ दिलेली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये कोट्यावधी रुपये शिक्षकांनी जमा करून कोरोना आपत्तीमध्ये कर्तव्यभावनेने मदत केलेली आहे, म्हणजेच शिक्षकांनी भरपूर प्रमाणात सामाजिक योगदान दिलेले आहे.
     महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ अहमदनगर यांच्या वतीने सदर सर्वेक्षणासाठी अगोदर विशेष कॅम्प लावून अगोदर शिक्षकांचे 100% लसीकरण पूर्ण करून मगच ठराविक दिवसांनंतर वरील सर्वेक्षण अथवा  कोरोना नियंत्रण  कामगिरी सोपवावी व होणारी गंभीर साखळी थांबवावी. असे निवेदनात म्हटले आहे.  सदरील निवेदनावर जिल्हा अध्यक्ष श्री माधव हासे, नारायण राऊत, रहिमान शेख,मिनाताई गिरमे,  गजानन ढवळे, कबाडी सर,राजेंद्र शिंदे, रविंद्र पिंपळे,अनिल आंधळे, पांडुरंग काळे,कल्याण शिंदे, नवनाथ तोडमल,राजाभाऊ बेहळे,भास्कर कराळे बाळासाहेब डमाळ,दादा वाघ, शैलेश खणकर इ.च्या स्वाक्षर्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post