कर्डिले यांनी पुरावे असल्याची स्टंटबाजी न करता सर्व कागदपत्र पोलिसांना द्यावे

कर्डिले यांनी पुरावे असल्याची स्टंटबाजी न करता सर्व कागदपत्र पोलिसांना द्यावे  - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेराहुरी - पत्रकार रोहिदास दातीर यांनी विधानसभेत माझ्या विजयासाठी पुढाकार घेतला. त्यांचे व तनपुरे कुटुंबियांशी कोणतेही वाद नव्हते. परंतु माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे बिनबुडाचे आरोप करून घटनेचे राजकारण करू पाहत आहे. सद्यस्थिती पाहता ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे. कर्डिले यांच्या खोट्या आरोपाचे सर्व कागदोपत्री पुरावे माझ्याकडे आहे. कर्डिले यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी कोणतीही वेळ वाया न घालवता तात्काळ पोलिसांकडे सादर करावे असे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

राहुरी येथे आयोजित पत्रका परिषदेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी  सांगितले की, तनपुरे कुटुंबियांचे राजकारण हे संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रृत आहेत. कधी कोणाला साधी चापटही आम्ही कधी मारली नाही. त्यामुळे कोणाचा जीव घेणे ही आमच्यासाठी लांबची गोष्ट आहे. उलट ज्यांचे राजकारण हे गुन्हेगारीतून पुढे आले त्यांनीच आमच्यावर खोटे आरोप करणे हा बालिशपणा आहे. मी कधी कोणाला अरेरावी सुद्धा कधी केलेली नाही. माझ्यावर सर्वांचा सन्मान करणे हेच संस्कार आहे. कर्डिले हे आरोप करून राजकारण करीत आहेत. त्यांनी डॉ. तनपुरे शिक्षण संस्थेच्या जमिनी खरेदी प्रकरणाचा उल्लेख केला. सन 1992 साली संस्थेची जमिन खरेदी झाली. त्या व्यवहाराचे सर्व कागदपत्र व खरेदी पत्र उपलब्ध आहे. याबाबत दातीर यांची कोणतीही तक्रार नव्हती. कर्डिले यांनी माझा मुलगा सोहम याचे नाव घेऊन आरोप केले. माझा मुलगा सोहम हा शालेय शिक्षण घेत आहे. त्याच्या नावावर कोणतीही जमिन खरेदी नाही. माझे मेव्हणे यांनी त्याच्या नावावर प्रॉपर्टी घेतली असेल. परंतु त्या प्रॉपर्टीबद्दल दातीर यांचा कोणताही वाद नव्हता.त्या जागेबाबत पूर्वी दातीर व पठारे यांच्यात न्यायालयिन लढा सुरू होता. परंतु दातीर यांनी मार्च 2020 मध्येच त्या प्रॉपर्टीबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी दस्ताऐवज न्यायालयात सादर केले आहे. त्याचा पुरावा दाखवित राज्यमंत्री तनपुरे यांनी कर्डिले यांच्या आरोपांना उत्तरे दिली.
तसेच रोहिदास दातीर यांचा खून 18 एकर क्षेत्रावरून झाल्याचे समजत आहे. पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आमची सत्ता आहे. आमच्याकडून संबंधित पालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर विकास कामे व्हावे असे अनेकदा ठराव मांडलेले आहे. त्याचे लेखी पुरावेही पालिकेत उपलब्ध आहेत. याबाबत कर्डिले यांना कोणतीही माहिती नसावी. त्यांनी पालिकेतील आपल्या नगरसेवकांकडून सत्य माहिती घ्यावी व मगच आरोप करावे. पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून पोलिस प्रशासन तपास काम करीत आहेत. ते नक्कीच घटनेचे सर्व काही सत्य जनतेपुढे आणणार असल्याची मला खात्री आहे. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या जवळील असलेले पुरावे असल्याची स्टंटबाजी न करता सर्व कागदपत्र पोलिसांना द्यावेत. घटनेचे राजकारण करून शिवाजीराव कर्डिले यांनी न करता आता तरी स्वतःमध्ये सुधार करावा. खोट्या आरोपामुळेच त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे असे तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post