नगर जिल्ह्यात तहसीलदारांच्या खाजगी वाहनाला अपघात

 शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड - पागिरे यांच्या खाजगी वाहनाला अपघात. माका गावाजवळील घटनाशेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या वाहनाला अपघात होऊन त्या जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान माका येथील खार्‍याचा ओढा येथे घडला.


याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे या आज सोमवारी आपल्या खाजगी वाहनाने शेवगाव येथे जात होत्या.त्या स्वतः वाहन चालवत येत असतांना माका ते निंबेनांदूर रस्त्या दरम्यान असलेल्या खार्‍या ओढ्याच्या वळणावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांची कार ओढ्यात जावून अपघात झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post