सुजित झावरे पाटील 'या' कारणांमुळे झाले भावनिक

 आज पहिल्यांदा फोन घेताना हात थरथरले......वैश्विक महामारी Covid च्या पार्श्वभूमीवर सर्व जण आपआपल्या पद्धतीने जनसेवा करीत आहे. मी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे माध्यमातून रुग्णांना Remedecivir देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, परंतु रुग्णांची संख्या आणि इंजेक्शनचे प्रमाण यात जमीन आसमानाचा फरक आहे.

आभाळच फाटले आहे, लोक फोनवर रडतात ओरडुन अक्षरशः काळीज थरथर कापते. ही परिस्थिती आहे साधारण २४ वर्षांपासून मी सक्रियसमाजसेवेत आहे अनेक वेळा D P  जळाली, पोलीस स्टेशनला काम, तहसिल, कलेक्टर, मंत्रालय  येथे काम हे फोन सहज घेत असत, आजच्या फोनवर मात्र एक प्रचंड तणावग्रस्त भीती, आक्रोश आहे पहिल्यांदाच माझे हात फोन उचलताना थरथर कापतायेत ही वस्तुस्थिती आहे.

आपण मानव परमेश्वरासमोर, निसर्गासमोर पालापाचोळा आहे ही वस्तुस्थिती स्वीकारावीच लागेल. त्यातच या गोष्टीत कोणी राजकारण  करते हे किळसवाणे आहे. 

अरे स्मशानभूमीतल्या सरणाकडे बघून तरी जागे व्हा प्रेत उचलायला माणसे नाहीत आणि आपण कसला मोठेपणा बढेजाव करतोय. एकीकडे विज्ञान, भौतिक प्रगती करत असताना मानवाला आध्यात्मिक व अंतरीक, आत्मिक ज्ञानाचा विसर पडत चाला असल्याने आज माणूस माणसाला खायला उठला हेच कलियुग आहे. कलियुगाबाबत "श्रीमद् भगवत्" गीते मध्ये भगवान श्रीकृष्णांनी हे वर्णन आधीच करून ठेवले आहे. त्याचे स्मरण आज होतेय, बास झाले आता राजकारणाच्या वेळी राजकारण करा आज ती वेळ नाही सर्वांनी एकोप्यानी हातात हात घालून या संकटाशी सामना करा. शेवटी एवढेच म्हणेल: 

'नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे'


सुजित झावरे पाटील

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post