श्रीगोंदा-दौंडला जोडणार्या गारगाव येथील पुलासाठी 20 कोटींचा निधी- खा.डॉ.सुजय विखे पाटील

श्रीगोंदा-दौंडला जोडणार्या घारगाव येथील पुलासाठी 20 कोटींचा निधी- खा.डॉ.सुजय विखे पाटील नगर दि.२८ प्रतिनिधी   श्रीगोंदा आणि दौंड शहराला जोडल्या जाणाऱ्या गारगाव येथील पुलाच्या कामाला १९कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.


श्रीगोदा तालुक्यातील घारगाव आणि अन्य सहा गावातून जाणाऱ्या या पुलाचे काम व्हावे आशी मागणी या गावांमधील  ग्रामस्थांसह व्यापारी आणि  नागरीकांची होती.या पुलाचे काम झाल्यास श्रीगोंदा आणि दौंड या  दोन तालुक्यातील दळणवळण सुकर होईल व्यापारी दृष्टीने देखील या मार्गाचे महत्व वाढेल आणि सहा गावांच्या विकासाला नवी दिशा मिळेल या उद्देशाने माझ्यासह  आ.बबनराव पाचपुते आ.राहूल कुल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.


मंत्री गडकरी यांना या मार्गाचे असलेले महत्व निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी १९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी या महत्वपूर्ण  पुलासाठी मंजूर केल्याबद्दल खा.विखे यांनी गडकरी यांचे आभार मानले.या पुलाचे काम लवकर मार्गी लागावे असा आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट करून खा.विखे पाटील म्हणाले की या पुलाचे काम पूर्ण होणार असल्याने श्रीगोंदा  दोंड यांसह पुणे जिल्हा जवळ येणार असल्याने श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाला संधी मिळतील असा विश्वास खा.विखे यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post