जिल्ह्यातील खेळाडू धावले कोरोना रुग्णांच्या मदतीला आरोग्य साहित्य भेट

 पाथर्डी खेळाडूं कडून आरोग्य साहित्य भेट  


पाथर्डी :तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होतच आहे.ती रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतच आहे.आपण सर्वानी कोरोनाचे वाढते संकट आटोक्यात आण्यासाठी शासनाला सहकार्य करून आपले कर्तव्य बजावले पाहिजे.कोरोना काळात माणुसकी ठेवत मदतीचा हात पुढे करावा. लेजंट्स क्रिकेट क्लब आणि अभिनव स्पोर्ट्स क्लबने केलेली मदत हि लाख मोलाची आहे.अश्या मदतीतून कोरोना विरुद्ध लढणाऱ्या योद्धाना अधिक काम करण्याचे बळ मिळते असे प्रतिपादन नायब तहसिलदार पंकज नेवसे यांनी व्यक्त केले. 


पाथर्डी शहरातील लेजंट्स क्रिकेट क्लब आणि अभिनव स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आरोग्य साहित्य भेट दिले आहे. ऑक्सिमीटर ,थर्मल स्कॅनर ,सॅनिटायझर ,मास्क इत्यादी वस्तू नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्याकडे आरोग्य यंत्रणेला लागणारी साहित्य सुपूर्त करण्यात आले आहे. त्यावेळी नेवसे बोलत होते.


याप्रसंगी महसूल कर्मचारी सुरेश बर्डे,अविनाश फुंदे,राजु सुरवसे,राणा खेडकर, जयंत कदम,नानाबालवे,मुसा सय्यद,बंडू तुपे,बिलाल शेख आदी उपस्थित होते. 


यावेळी बोलतांना अँड राणा खेडकर म्हणाले, सध्या गंभीर परिस्थितीत कोरोना संसर्गाची आहे. वाढती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे.तालुक्यात याचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल त्यासाठी सर्व मित्रांनी हि प्रशासनाला मदत केल्याचे यावेळी खेडकर म्हणाले. सुरेश बर्डे यांनी लेजंट्स क्रिकेट क्लब आणि अभिनव स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांचे आभार मानले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post