शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी सलीमखान पठाण, बाबासाहेब खरात व्हाईस चेअरमन

 शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी सलीमखान पठाण,  बाबासाहेब खरात व्हाईस चेअरमन नगर - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली. बँकेच्या चेअरमनपदी नगरपालिका विभागाचे संचालक सलीमखान पठाण यांची तर व्हा. चेअरमनपदी राहत्याचे संचालक बाबासाहेब खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सहाय्यक निबंधक एस एल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदरची निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी पठाण यांचे नाव संचालक गंगाराम गोडे यांनी सुचवले तर अनुमोदन संचालक अनिल भवार यांनी दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी बाबासाहेब खरात यांचे नाव संचालक किसन खेमनर यांनी सुचवले तर अनुमोदन संचालक सुयोग पवार यांनी दिले.यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून उप निबंधक कार्यालयाचे विक्रम मुटकुळे तसेच शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, संजय चौधरी यांनी सहकार्य केले. या प्रसंगी शिक्षक बँकेचे संचालक शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे,अनिल भवार ,साहेबराव अनाप, विद्युल्लता आढाव, उषाताई बनकर, अर्जुन शिरसाठ,  चेअरमन राजू राहाणे, किसन खेमनर,बाळासाहेब मुखेकर, गंगाराम गोडे,सुयोग पवार उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी गुरुमाऊली मंडळाच्या झालेल्या कोअर कमिटीच्या मीटिंग मध्ये चेअरमन पदासाठी सलीमखान पठाण व व्हाईस चेअरमन पदासाठी बाबासाहेब खरात यांची नावे अंतिम करण्यात आली. याप्रसंगी गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे, राज्यसंघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, रामेश्वर चोपडे, विठ्ठल फुंदे, बाळासाहेब तापकीर, नगरपालिका संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे, माजी चेअरमन गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, संदीप ठाणगे, दीपक बोराडे, सुरेश निवडूंगे, शिवाजी वाघ उपस्थित होते.

त्यानंतर बँकेच्या मुख्य शाखेमध्ये पदग्रहण सोहळा पार पडला. त्यावेळी संतोष वाघमोडे, श्याम पटारे, फारूक पटेल, दीपक शिंदे, सुनील गायकवाड, अमोल साळवे, राजू गायकवाड, सुनील घोगरे, रामकिसन भालेकर, बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post