शेवगांव तालुक्यातील 23 गावांचे सॅनिटायईझेशन

 शेवगांव तालुक्यातील 23 गावांचे सॅनिटायईझेशन

खा डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कापरे पाटील मित्र मंडळाचा उपक्रमशेवगांव - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही  दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी  सरकार व प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. टेस्टींग, लसीकरण, सॅनिटायझेशन, कोविड सेंटर, जनजागृती याद्वारे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या कार्यात सामाजिक संस्थाही सहभागी होत आहेत. याच अभियानांतर्गत शेवगांव तालुक्यातील सामानगाव मधील विजय कापरे पाटील मित्र मंडळाच्यावतीने खा. डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "चला आपले गांव सॅनिटाईझ करु या.. कोरोनावर मात मिळू"  या घोष वाक्यसह पंचक्रोशितील 23 गावात मोफत विशेष सॅनिटाईझेशन अभिवान राबविण्यात आले. या अभियानासाठी विजय कापरे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांना संजय खरड, उमेश कापरे, आदिनाथ वांढेकर, मयूर म्हस्के, सुधीर कापरे, पांडूरंग खरड, बाळासाहेब गव्हाळ, संतोष कांबळे, प्रविण कालकुंबे, दत्तात्रय जाधव, सुभाष देवढे, सुभाष कोठे, ज्ञानेश्‍वर काकडे,गणेश सातपुते,तुषार खरड आदि खंबीर साथ देत आहेत. 

या अभिनाविषयी सांगतांना विजय कापरे म्हणाले, कोरोनाची दुसरी लाटमुळे अनेक नागरिक कोरोना बाधित होतांना दिसत आहेत. ती रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांचेही कर्तव्य आहे की  शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यात सोशल डिस्टिसिंग, मास्क, सॅनिटायझेशन ही महत्वाची त्रिसुत्री आहे. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक काळजी घेत आहेच परंतु सार्वजनिक ठिकाणीहून होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणे सॅनिटाईझ करत आहोत. जेेणेकरुन या संसर्गास आळा बसेल. यासाठी  दि.13 गुढीपाडव्या पासून ‘चला आपले गांव सॅनिटाईझ करु या.. कोरोनावर मात मिळू या’ हे अभियान सुरु करण्यात आले.  गावातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, आरोग्य केंद्र, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी, चावडी,  मंदिरे, बाजारपेठ, दाट लोकवस्तीचे ठिकाणी, दुकाने आदि ठिकाणीचा परिसराचे संपूर्ण सॅनिटाईज करण्यात आले. सामानगावपासून सुरु केलेल्या नंतर  लोळेगाव, वडूले, मळेगाव, वडूले खुर्द, वाघोली, देवटाकळी, बक्तापुर, भायगाव ढोरजळगांव शे, आपेगाव, जोहरापुर, हिंगणगाव-ने, नींबे,नांदुर,आव्हाणे बु गणपती, गरडवाडी, बराणपुर, खामगांव, मालकापुर, मौजे अखतवाडे, भातकुडगाव आदि गांवाबरोबर पंचक्रोशितील  ज्या ग्रामस्थांनी मागणी केली त्या गावाचे मोफत सॅनिटायझेशन करण्यात आले. दि. 21 एप्रिलपर्यंत सामानगाव पंचक्रोशितील 23 गावे सॅनिटाईज करण्यात आली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post