पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा....video

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा.... 



शेवगाव- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कुचकामी ठरले असुन याची सर्वस्वी जबाबदारी घेत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष श्री गणेश रांधवणे यांनी केली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त कि अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली असून जिल्ह्यात रेमडीसिव्हचा काळा बाजार राजरोसपणे सुरु आहे. सामान्य नागरिकांना रेमडीसिव्हर व बेड मिळत नाहीत यामुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन  मिळत नसल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबियांचे मरण डोळ्यासमोर पहावे लागत असून अनेक रूग्णांचे नातेवाईक बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन साठी दिवस रात्र फिरत आहेत. या सर्व गोष्टींना प्रशासनाचा निष्काळजीपणा व चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. कोरोना वरील लशी बाबत हि जिल्ह्यात तिच  परिस्थिती असून लशीसाठी नागरिकांना हेलपाटे घालायची वेळ आली आहे. तसेच यासर्व  गोष्टीसाठी नागरिकांची  राजरोसपणे लुट सुरू आहे.   यासर्व गोष्टीचे नियोजन करण्यात जिल्हा प्रशासन व पालकमंत्री पूर्ण पणे अपयशी ठरले आहेत वास्तविक पालकमंत्री यांनी याबाबत प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन करणं गरजेचं होतं मात्र यात त्यांनी लक्ष घातल्याचे दिसून येत नाही.नागरिकांना ऑक्सिजन बेड, रेमडीसिव्हर वेळेत उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरले असुन   याबाबत  जिल्ह्यात हाहाकार माजलेला असुन यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष श्री गणेश रांधवणे यांनी केली आहे तसेच तालुक्यातील प्रमुख ग्रामीण रूग्णालयात देखील कोविड सेंटर उभारून याठिकाणी बेडची व्यवस्था करावी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी सूचना देखील त्यांनी केलेली आहे.
bite


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post