नोकरीची सुवर्णसंधी, स्टेट बँक ऑफ इंडियात लिपिकांची मेगा भरती

 


देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लेरिकल केडर मध्ये ज्युनियर असोसिएट पदांवर  भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. ही भरती तब्बल ५,२३७ पदांसाठी होणारी जम्बो भरती आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया १७ मे २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. 

महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - २७ एप्रिल २०२१

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत - १७ मे २०२१

प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटर - २६ मे २०२१

प्रीलिम्स एक्झाम डेट - जून २०२१

मेन एक्झाम - ३१ जुलै २०२१कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य. जे विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत, मात्र अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र १६ ऑगस्ट २०२१ पूर्वी मिळायला हवे.
वयोमर्यादा

२० ते २८ वर्षे. उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९३ पूर्वी आणि १ एप्रिल २००१ नंतरचा नसावा. वयाची गणना १६ ऑगस्ट २०२१ या तारखेनुसार होईल.


निवड प्रक्रिया

सर्वात आधी ऑनलाइन पूर्व परीक्षा घेतली जाईल. यात उत्तीर्ण होणारे उमेदवार ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.

पूर्व परीक्षा एक तास कालावधीची असेल. यात इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि तार्किक क्षमतेशी संबंधित एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post