शिक्षकांचे आधी लसीकरण करा, मगच नेमणुका द्या

 शिक्षकांचे आधी लसीकरण करा, मगच नेमणुका द्या - सरोदेअहमदनगर (प्रतिनिधी) -जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील 18 ते 20 प्राथमिक शिक्षक कोरोना ला बळी पडले आहेत. सध्या शासनाने जिल्हाभरात घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये शिक्षकांना देखील नेमणुका देण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी कोवीड सेंटर वर सुद्धा शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आधी लस देण्यात यावी व नंतर त्यांचे नियुक्त्या करण्यात याव्यात अशी मागणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे अशी माहिती गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये कोरोना ला पायबंद घालण्यासाठी शहरी व ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन आशा वर्कर समवेत प्राथमिक शिक्षक,शिक्षिका यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत . मात्र शिक्षकांच्या कुटुंबीयांमध्ये कोरोनाने बळी गेलेल्या शिक्षकांमुळे भितीचे वातावरण पसरले आहे. म्हणून सर्वेक्षणासाठी नियुक्ती करण्या अगोदर जिल्ह्यातील सर्व  शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून निवेदनावर गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्युलता आढाव,दक्षिण विभाग प्रमुख संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, सरचिटणीस संदीप मोटे कार्याध्यक्ष किसन वराट, रामेश्वर चोपडे, बाळासाहेब सरोदे आदींच्या सह्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post