सलून चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अन्यथा आमरण उपोषण

 राज्य सरकारने सलून चालू ठेवण्याची परवानगी द्यावी किंवा आर्थिक मदत करावी अन्यथा आमरण उपोषण करणार - पै.अजय रंधवे       


                                                                      

     आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नाभिक समाज व महाराष्ट्रातील बारा बलुतेदार यांना परत लॉकडाऊन होण्याची भीती आहे.त्यात राज्य सरकारने आज सलून दुकाने बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे परत उपासमारीची वेळ येणार आहे.राज्य सरकारने याची दखल घ्यावी. सलून दुकाने बंद झाल्यास नाभिक समाजाचा आर्थिक प्रश्न गंभीर होणार असून अताच कुठे तरी सलून व्यवसाय पूर्वपदावर येत असताना राज्य सरकारने या बंदची घोषणा केल्याने आधीच ७०% व्यवसाय बंद झाला आहे.अनेक नाभिक व्यवसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत.नाभिक व्यवसायावर आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत.त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी तसे न झाल्यास नाभिक समाज, बाराबलुतेदार यांच्यासहित आमरण उपोषण करणार असल्याचे महाराष्ट्र नाभिक महामंडळ सोशल मिडिया राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य पै.अजय रंधवे यांनी आज सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post