सहयाद्री चौकात भरतो भाजीबाजार , स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष पोलीस

 सहयाद्री चौकात भरतो भाजीबाजार , स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष पोलीस  प्रशासनाचे डोळेझाकनिंबळक: - कोरोना च्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे भाजी बाजार बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिले असतानाही नगर मनमाड महामार्गावरील एमआयडीसी येथील सहयाद्री चौकात मोठया प्रमाणात बाजार भरत आहे . भाजीपाला घेण्यासाठी नागरिंकाची मोठया प्रमाणात गर्दी होत असून विनामा स्क नागरिक फिरत आहे . सदर बाजार ग्रामपंचायत हद्दीत भरत असला तरी हा परीसर एमआयडीसी च्या आवारात आहे . पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे .

नवनागापूर ( ता.नगर )  या भागात मोठया प्रमाणात कोरोना ग्रस्त रुग्ण ची संख्या आहे .एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे . या परीसरातील नागरिक एमआयडीसी मध्ये कामाला जातात . प्रशासनाने कोरोनाची वाढती रुग्ण संख्येमुळे भाजीपाला घरपोहच विक्री साठी परवानगी दिली असताना भाजी विक्रेते सह्याद्री चौकात ठाण मांडून बसले आहे . प्रशासनाच्या आदेशाला या भाजी विक्रेते ने केराची टोपली दाखवली आहे . ग्रामपंचायत ही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे . गावोगावी स्थानिक पातळीवर कोरोनासाठी कमिटी स्थापन केली असताना हे भाजी विक्रेते भाजीबाजार भरवतात कसे असे स्थानिक लोंकामध्ये प्रतिक्रिया दिसत आहे. हाकेच्या अंतरा वर पोलीस स्टेशन असतानाही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे . पोलीसानी एक चक्कर मारली तरी भाजी विक्रेते बसणार नाही .

ग्रामविकास अधिकारी

संजय मिसाळ- या भाजीविक्रेते ना बसण्यासाठी परवानगी ५िलेली नाही . ग्रामपंचायत कर्मचारी गेले तर त्याना हे  भाजीविक्रेते आरेरावीची भाषा वापरतात . पोलीस प्रशासनाने सहकार्य केले तर हे भाजी विक्रेते येथे बसणार नाही . सकाळी दोन तीन चक्कर पोलीस कर्मचाऱ्यानी मारल्या पाहिजे 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post