सहकारी बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी

सहकारी बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी पुणे - राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दर्शविली असून, तसा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला आहे.

राज्यातील सहकारी बँकिंग कार्यक्षेत्रात सर्व जिल्हा सहकारी बँका, सर्व नागरी सहकारी बँका, नागरी बँकांच्या सर्व जिल्हा असोसिएशन फेडरेशन येथील संचालक, अधिकारी आणि सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना लसीबाबत राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असून, ज्या वयोगटासाठी मोफत लसीचे धोरण निश्चित केले जाईल, त्याव्यतिरिक्त १८ वर्षांवरील सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य बँक घेणार आहे.

राज्य बँकेच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ३१ जिल्हा बँकांमध्ये सुमारे २० हजार २४ आणि नागरी बँकांमध्ये सुमारे एक लाख ९० हजार कर्मचारी आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post